भारताचा सगळ्यात बेष्ट कॅप्टन कोण म्हणलं की आपल्या तोंडात एकच नाव येतं ब्वा… महेंद्रसिंग धोनी…
नव्वदीच्या काळात जन्मलेल्या आपल्या सारख्या गाबड्यांना सचिन, दादा, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण ह्या पोरांनी क्रिकेट आवडायला भाग पाडलेल… विकेटकीपर म्हणजे कोणतरी फलंदाज कामापुरता उभा केलेला आमच्या पिढ्यांनी कित्येक वर्ष बघितलेला… तसा स्पेशल विकेटकीपर म्हणून आम्हाला एकच नाव माहिती गिलख्रिस्ट… कित्येक वर्ष ह्यांचे सामने बघत आपले दिवस गेले… मग दादा कॅप्टन असताना एक उनाडग्या करत फिरणाऱ्या पोरांसारख एक पोरगं टीममध्ये आलं… केसं वाढवलेली… वागण्या बोलण्यात नुसता बेदरकार पणा… तसं का असनां पण हे पोरगं जरा वांड दिसायचं आणि खेळायचं पण… कोणत्याच बॉलर च्या बॉल वर सुट्टी द्यायचं नाही… ट्वेंटी ट्वेंटी ला भारी म्हणून ह्याला कॅप्टन केलं आणि हे ठरलं दुनियाचा भारी कॅप्टन… भारतासाठी…
धोनी दुनियाचा भारी का आहे त्याबद्दल काही…
- कसोटी सामन्यात भारताचे नैतृत्व करणारा पहिला विकेटकीपर.
- कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार.
- देश-परदेशातही पहिला कसोटी जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार.
- महेंद्रसिंग धोनी हा असा एकमेव भारतीय कीपर असून त्याने कसोटी सामन्यात ४,००० धावा केल्या आहेत आणि २०० खेळाडू बाद केले आहेत.
- सलग पाच मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार.
- ३३ वर्षांत न्यूझीलंडच्या भूमीवर जिंकणारा धोनी हा पहिला भारतीय कसोटी कर्णधार ठरला.
- आयसीसी च्या तीनही प्रमुख स्पर्धा ट्वेंटी ट्वेंटी विश्वकप, एकदिवसीय विश्वकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार.
तर असा हा दुनियाचा भारी कॅप्टन हाय आणि अर्धाकपच्या पोरांकडून त्याला फुल्ल स्पेशल कप भरून शुभेच्छा… कसंय… थांक्यू हे असलं आपल्या पोरांना जमत नाय ना म्हणून…