दादा, प्रिन्स… आणि काय काय म्हणतात गांगुलीला…

0
1343

सौरभ गांगुलीचा आज वाढदिवस… आता त्याच्याबद्दल एवढं सगळीकडे क्रिकेट, करीयर, रेकॉर्ड्स वर लिहिलेलं असताना आपण काय सांगायचं हा प्रश्न पडलेला… मग विचार केला की त्याच्या बद्दल खूप साऱ्या नावांनी लिहिलं जातयं तर मग आपण त्याच्या नावांबद्दलच का लिहू नये… वाचा तुम्हाला पण आवडेल…

  • “दादा” – सौरव गांगुली हा पश्चिम बंगालचा आहे, जेथे वडील पुरुष व्यक्तीला “दादा” म्हणून संबोधले जाते. इतर भारतात दादा शक्यतो डॉन अर्थाने असतोय. भाऊ असो वा डॉन कप्तान दोन्ही आघाड्यावर आपला दादा तेवढाच सिद्ध करत असायचा. पिचवर डॉन वाटणारा सौरव ड्रेसिंग मध्ये भावासारखा असायचा. नवीन आलेल्या पोरांना विश्वास देऊन संधी द्यायचा. जुन्या जाणत्यांना सांभाळून घ्यायचा. वेळप्रसंगी कठोर, अनाकलनीय निर्णय घ्यायचा पण ते सगळं आपल्या टीमसाठी असायचं… हे सगळं आपल्यात मोठा भाऊच करतो ना?
  • “बंगाल टायगर” – सौरव गांगुली बंगालचा. रॉयल बंगाल टायगर्स बंगालमध्ये (भारत, बांग्लादेश दोन्ही) लय प्रसिद्ध आहेत. हे वाघ गर्व, धैर्य, आक्रमकता यांचे प्रतीक आहेत. मग आपला दादा ह्यात कुठं कमी हाय व्हय? दोन पावलं पुढं येऊन मारलेला षटकार हा वाघाने शिकार करताना जो अवतार असायचा ना तसाच दिसायचा की. दादाकडे ह्यातील सर्व गुण असल्याने पब्लिक या दुर्मिळ कप्तानाला ‘बंगाल टायगर’ म्हणणारच की..!
saurav
  • “महाराजा” – नावातच सगळं हाय की… म्हणजे वागण्या बोलण्यात जो थाट असतो तोही हाय आणि महाराजावर जी जबाबदारी असतेय ती पण हाय. अजून एक घटना हाय, सिद्धच करायला आपल्याकडे काय कमी नाय… एकदा, माजी भारतीय कर्णधार रवी शास्त्री यांनी सौरव यांना विचारलं की, ईडन गार्डन्समध्ये सौरवच नाव का नाही? सौरवने अगदी स्पष्टपणे उत्तर दिले की…

“संपूर्ण मैदानच माझं आहे”

  • “भारतीय क्रिकेटचा महाराजा” सोडून इतर कोणाकडूनही इतकं मोठं विधान आलं असतं का?
Sourav Ganguly 1
  • “प्रिन्स” : वर सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या दादाला प्रिन्स म्हणून सार्थ करतातच की पण तरीही हे नाव कुठून रूढ झालं तर ते जेफ्री बॉयकॉटने केलेल्या उल्लेखानंतर “प्रिन्स” हे नाव सौरवशी कायमचे जोडले गेले. ऑफसाइडच्या दिशेने जाणाऱ्या त्यांच्या “सिल्कन ड्राईव्ह”वर भाष्य करताना जेफ्रीने सर्वप्रथम “कलकत्याचा राजपुत्र” हा उल्लेख केला, जो दादाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या यशाने व्हायरल झाला आणि प्रत्येकाने हा शब्द वापरण्यास सुरवात केली.
souravgangulyshirt 1
  • “गॉंड ऑफ ऑफ साईड” – अर्थातच त्याच्या लेफ्टी म्हणजे डाव्या बाजूने खेळण्याच्या शैली ने त्याला हे संबोधन मिळालं पण नेमकी गोष्ट काय आहे? द्रविड एकदा म्हणाला होता – ऑफसाइडवर देव आहे, मग दादा आहे. अजून काय पाहिजे…

तर अशा दादा माणसाला आपल्या अर्धाकपकडून स्पेशल कडक शुभेच्छा… दादा जान हाय आपल्या सगळ्यांची…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here