एखाद्या व्हायरस बरोबर आपल्या शरीरातलं सैन्य लढतं तरी कसं?

0
1170
vaccine

कोरोनाव्हायरस त्यावर शोधल्या जाणाऱ्या लसींचे परिणाम समजून घेण्यासाठी प्रथम आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती काम कशी करते आणि त्यावर प्रतिक्रिया कशी देते हे समजून घेणे आवश्यक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय तर एखाद्या आजारावर स्वतःच्या शरीराने दिलेला लढा म्हणा पाहिजे तर..

वरच्या बाजार गप्पांना अनुसरून आपल्याला दोन अत्यंत महत्त्वपूर्ण पेशींबद्दल माहित असणे आवश्यक आहे: बी पेशी आणि टी पेशी. डेंजर ना? बी आणि टी पेशी म्हणजे काय ते आपल्याला काय घंटा माहिती? म्हणून तर आपल्याला आम्ही झटक्यात माहिती देतोय इकडं जरा लक्ष द्या.

बी-सेल्स आणि टी-सेल्सला लिम्फोसाइटस देखील म्हणतात.

आपण सगळ्यांनी पांढऱ्या पेशींबद्दल ऐकलं असेलच… नसेल ऐकल तर सांगतो पांढऱ्या पेशी ह्या रक्तातील अशा पेशी असतात ज्या संसर्ग किंवा बाह्य घटकांमुळे झालेल्या आजार किंवा रोगावर प्रतिकार करतात आणि त्यांच्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करतात… म्हणजे युद्धच असतंय एक प्रकारचं ज्यात पांढऱ्या पेशी ह्या आपल्या शरीराच्या बाजूने सैनिकांचं काम करतात. आता थोडं पुढं सरकू.

बी पेशी, ज्याला बी लिम्फोसाइट्स सुद्धा म्हणतात, ह्या एक प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशी आहेत. बऱ्यापैकी बी पेशी ज्यांना विज्ञानात “प्लाझ्मा सेल्स” देखील म्हणतात, त्या त्यांच्या संपूर्ण वाढीनंतर संक्रमणास सामोरे जाण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज (प्रथिने) मध्ये तयार होतात. काही राहिलेल्या बी पेशी “मेमरी बी पेशीं”मध्ये तयार होतात… व्हय मेमरी बी पेशी… तेच काम करतात जे आपलं मेमरी कार्ड करतं आधी केलेले सगळे कांड साठवून ठेवायचं… ही सगळी माहिती लस कशी काम करते याचा बेसिक आधार आहे – एखादा विषाणू शरीरावर हल्ला करत असल्यास रोगप्रतिकारक शक्तीला रोग ओळखण्यासाठी आधीच्या रोगाचा एक लहान, निरुपद्रवी प्रथिन वापरला जातो. म्हणजे त्याच्याच सैन्यातील फुटीर म्हणा हवं तर…

एकाच बी पेशीमधून तयार झालेल्या सगळ्या प्लाझ्मा पेशी एकसारख्या अँटीबॉडीज तयार करतात. आणि ज्या रोगाशी लढताना तयार झाल्यात त्याचा प्रोग्राम फिट्ट करून मेमरी पेशीत ठेवतात. म्हणजे परत जर तसला रोग आलाच तर सैन्य एकदम तयारीत पाहिजेल की मागच्या वेळी आपण ह्याच्याशी कसं लढलेलो… तस्स एकदम शिस्तीत काम असतंय… आता ह्या “बी पेशी” नेमक्या कुठं परिपक्व होतात तर त्या होतात आपल्या अस्थी मज्जा मध्ये म्हणजेच बोन मैरो मध्ये म्हणजेच हाडातल्या चरबीत…

आत्ता येऊ “टी पेशीं”कडे..

“टी पेशी” मूळ अस्थिमज्जामध्ये तयार होतात आणि थायमसमध्ये (thymus) त्या एकदम परिपक्व होतात.  थायमसला मराठीत काय म्हणतात तर उरोधिष्ट ग्रंथी… आपण थायमसच म्हणू… थायमस मध्ये पक्व होतात म्हणून त्यांना “टी पेशी” म्हणतात. थायमस मध्ये, “टी पेशी” आपली संख्या झटक्यात गुणाकाराने वाढवतात आणि त्या पेशीचे मदतनीस (हेल्पर) म्हणून काम करणाऱ्या,  नियमित (रेग्युलेट) करणाऱ्या किंवा विनाश करणाऱ्या पेशी (सायटोटॉक्सिक) टी पेशींमध्ये विभागल्या जातात तसेच काही मेमरी टी पेशी देखील असतातच. त्यानंतर हे सगळं तयार झालेलं मटेरिअल गौण उतींकडे पाठविले जातं किंवा रक्त किंवा लसिका प्रणालीत म्हणजेच लिम्फॅटिक सिस्टम मध्ये फिरवलं जातं.

एकदा रोगाच्या हल्ल्याने व्यवस्थितरित्या उत्तेजित झाल्यावर हेल्पर “टी पेशी” साइटोकिन्स नावाचे रासायनिक संदेश वाहक तयार करतात, ज्यामुळे “बी पेशीं”चे प्लाझ्मा पेशीमध्ये रूपांतरण करण्यास मदत होते. नियमित (रेग्युलेट) करण्याऱ्या “टी पेशी” रोगप्रतिकारशक्ती मध्ये होणाऱ्या प्रक्रिया कंट्रोल करतात आणि विनाश करणाऱ्या पेशी (सायटोटॉक्सिक) संसर्ग किंवा बाह्य आक्रमण थांबवण्यास किंवा त्याचा खात्मा करण्यास मदत करतात.

तर असं समदं असतय बघा…

थोडक्यात काय तर एकदम शिस्तीत… नियोजनबद्ध कार्यक्रम असतोय सगळा… आता ह्या सगळ्यात कोरोनावर आक्रमण करणारा प्रोग्राम आपल्याकडे नाहीय.. आणि तोच प्रोग्राम तयार करून सैनिक आणि सिस्टीम लढायला लावायला लसीचा शोध लावण्याचं काम चालूय… ऑक्सफोर्ड सगळ्यात पुढं हाय आणि भारतातील सिरम कंपनी त्यांच्याबरोबर काम करतेय… सगळं नीट झालं तर डिसेम्बर पर्यंत आपल्याला युद्ध करायला सैनिकी प्रशिक्षण मिळेल नायतर हायच धुव्वा उडालेला… असो तुम्ही तोवर काळजी घ्या… उगा शक्तिमान बनून बोंबलत फिरू नका…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here